श्रीगोंद्यात वयोवृध्दाचा चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :चॉकलेटचें आमिष दाखवून अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर एका ७५ वर्षांच्या वृध्दाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना श्रीगोंदा येथे घडली. या घटनेबाबत मुलीच्या वडिलांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वयोवृद्ध आरोपी दादाभाऊ शेंडगे याच्या विरोधात ॲट्रॉसिटी, बाल लैंगिक अत्याचार कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर माहीती अशी की, मूळचे नगर तालुक्यातील एक कुटुंब आरोपीच्या शेतात मजुरीचे काम करतात. दि ३१ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदर पीडित मुलीचे आई, वडील त्यांच्या नातेवाईकांसह शेतात काम करण्यासाठी गेले. तेव्हा त्यांची मुले पत्र्याच्या खोलीत खेळत होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने चार वर्षांच्या पीडित चिमुरडीस चॉकलेट देऊन तिला स्वता:च्या घरी नेले.

दरम्यान साडेसहा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीची एक नातेवाईक महिला त्या मुलीला आरोपीच्या घरी आणण्यासाठी गेली असता. तो वृध्द आरोपी त्या मुलीशी अश्लील वर्तन करून तिच्यावर अत्याचार करत असल्याचे त्यांनी पाहिले. याबाबत नातेवाईक महिलेने आरोपीकडे विचारले असता. त्याने आम्ही खेळ खेळत होते असे सांगितले. 

ती महिला मुलीला घेऊन गेली. त्यानंतर घडला प्रकार मुलीचे आई वडील व नातेवाईकांना समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी दादाभाऊ शेंडगे(पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यावरून पोलिसांनी बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कायदा व अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.