नगर शहरातील शिवसेना राठोड प्रायव्हेट लिमिटेड झालीय !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पक्षविरोधी काम केल्यानेच माजी मंत्री अनिल राठोड यांना मंत्रीपदावरून डच्चू देण्यात आला अशी टीका शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनी केली. दिगंबर ढवण मित्र मंडळ आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते. 

गेली 25 वर्षे नगर शहरातील जनतेने यांना आमदार केले. तेथे विकासाचे कुठल्याही प्रकारचे ठोस काम केले नाही. ज्या कार्यकर्त्यांनी राठोड यांना मोठे केले. त्या कार्यकर्त्यांचे पंख छाटून कार्यकर्ते संपवण्याचे काम माजी आमदार अनिल राठोड हे करीत आहेत. नगर शहरातील शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना राहिली नसून राठोड प्रायव्हेट लिमिटेड सेना झाली आहे. असे त्यांनी यावेळी सूचित केले .

दिगंबर ढवण यांनी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले समाजकारण विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळे जनता ढवण यांच्या पाठीशी आहे हे जनतेने मोठया संख्येने उपस्थित राहून कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या पाठीशी आम्ही एकजूटीने भक्कमपणे उभे राहणार आहोत.

यावेळी पारनेर शिवसेना माजी तालुका प्रमुख बंडखोर नेते निलेश लंके म्हणाले संघटनेत निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होतो. संघटनेत पदाधिकारी यांना महत्व न देता लोक प्रतिनिधींना महत्व दिले जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आमच्या हातात आता दांडा आहे, झेंडा कोणता लावायचा हे आम्ही ठरवू. 

दिगंबर ढवण यांनी बोलताना म्हणाले, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आध्यात्मिक सदगुरु यांच्या शिकवणीनुसार मी जनतेची सेवा करीत राहणार.जनतेशी बांधिलकी म्हणून संघर्ष करत राहून विकासाचे राजकारण करत राहणार जनतेचे प्रश्­न सोडवणार. संघर्षातील कार्यकर्त्याला जनतेचे नेहमी पाठबळ आहे हे हजारोच्या संख्येने उपस्थित राहून जनतेने दाखवून दिले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.