वेळत निधी खर्च न केल्याने महापालिकेवर साडेतीन कोटी निधी परत करण्याची नामुष्की


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निधी नाही म्हणून ओरड करणाऱ्या महापालिकेचा तब्बल साडेतीन कोटी अखर्चित निधी परत गेला आहेत. त्यात सीनानदी सुशोभिकरणासह मुलभूत सुविधा या लेखाशिर्षाखाली उपलब्ध झालेल्या निधीचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध झालेला निधी वेळत खर्च न झाल्याने निधी परत करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे.
Loading...

महापालिकेची आर्थिक स्थिती अतियश नाजूक असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार देखील वेळत करणे जिकिरीचे झाले असतांना विकास कामे करणे तर अवघड आहे. अशा परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीसह शासनाच्या विविध योजनांमधून विकास कामांसाठी उपलब्ध झालेला निधी वेळेत खर्च न झाल्याने तो अखर्चित राहिला.

परिणामी तो परत पाठविण्याची वेळ महापालिकेवर आली. अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांकडून निधी वेळ खर्च करण्याबाबत कोणताही पाठपुरावा होत नसल्याचे हे कारण आहे. विकास कामांसाठी निधी नाही म्हणून नगरसेवक ओरड करतात. पण आहे तो निधी देखील खर्च होत नाही ही दुसरी बाजूही या निमित्ताने समोर आली आहे.

सीना नदी सुशोभिकरण एक कोटी 4 लाख तर मुलभूत सुविधाचा एक कोटी निधी परत गेला आहे, असा दोन कोटी 4 लाख निधीसह नागरी अनुसूचित जाती वस्ती सुधारणा निधी अन्य शासकीय योजनांचा तब्बल दीड कोटी निधी परत पाठवावा लागला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.