केडगावमध्ये पैशाच्या वादातून डोक्यात दगड घालून एकाचा खून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील युवकाचा त्याच्या मित्रानेच पैशाच्या वादातून डोक्यात दगड घालून खून करत तरुणाचा मृतदेह कापडात गुंडाळून केडगाव ते अरणगाव जाणाऱ्या रस्त्यावर नेऊन टाकल्याची घटना गुरुवारी (दि. २९) रात्री घडली आहे. 

राहुल भागवत निमसे (वय ३२, रा. मोहिनीनगर, केडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी खून करणाऱ्या अमित बाबुराव खामकर (रा. केडगाव) यास नगर तालुका पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत राहुल व अमित खामकर व्हीआरडीई येथे सफाई कामगार म्हणून नोकरीस होते. त्यांच्यात आधीपासून एकमेकांसोबत वाद व्हायचे. गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राहुल याला मित्राचा फोन आल्यामुळे तो घरी आईला अमित खामकरकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर गेला. 

Loading...

राहुलचा भाऊ राजू निमसे हा नगरमध्ये कामानिमित्त गेलेला असताना तो रात्री घरी आल्यावर राहुल अमितकडे गेल्याचे त्याला कुटुंबियांनी सांगितले. त्यानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गोरख कल्हापुरे (रा. अरणगाव) यांनी राजूला तातडीने केडगाव-अरणगाव रोडवर शरद मुथ्था यांच्या रिकाम्या प्लॉटजवळ येण्यास सांगितले. 

राजू हा तेथे गेला असता त्याला पोलिस व नागरिकांची मोठी गर्दी दिसली. तेव्हा मोकळ्या जागेत त्याला बेडशीटमध्ये भाऊ राहुल निमसेचा मृतदेह आढळून आला. तेथे जमलेल्या लोकांनी राहुलला अमित खामकरने मारल्याचे राजूला समजले. त्यानूसार राजू निमसे याने नगर तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला. 

Loading...


दरम्यान, अमितला पैशांची गरज असल्यामुळे त्याने राहुलला पैसे मागितले होते. मात्र राहुलने पैसे देण्यास नकार दिला. याचा अमितला राग आल्याने त्याने राहुलला फोन करून बोलावून घेत त्याचा खून केल्याची बाब प्रथमदर्शनी समोर आली आहे. 

त्यानंतर अमितने भाऊ गणेश खामकर याला ही माहिती सांगितली. गणेशने कोतवाली पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानूसार नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि. किशोरकुमार परदेशी यांच्या पथकाने नाकाबंदी करत त्याला ताब्यात घेतले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.