एअर बॅग्स मुळे वाचले माजीमंत्री पाचपुते यांच्यासह त्या तिघांचे प्राण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या चारचाकी वाहनाला शुकवार दि.२९ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुणे नगर मार्गावर सरदवाडी जवळील पिर फाट्यानजीक अपघात झाला. या अपघातातून पाचपुते बालंबाल बचावले. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, माजी मंत्री बबनराव पाचपुते हे शुक्रवारी रात्री नगरहून पुण्याकडे त्यांच्या फोर्ड इंडिव्हर या चारचाकी वाहनाने पुण्याला चालले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहायक योगेश भोसले चालक युवराज उबाळे हे होते. 

Loading...
साधारणत: रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी नगर पुणे रस्त्यावरील सरदवाडीजवळील पीर फाट्यानजीक आली असता. रस्त्यात एका ट्रकचा बिघाड झाल्यामुळे ती ट्रक रस्त्यातच उभी होती. अंधारात रस्त्यात मध्येच ट्रक उभी होती. 

त्या ट्रकला कुठलीही पार्किंग लाईट किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काहीच नसल्यामुळे पाचपुते यांच्या चालकाला ट्रक उभी असल्याचे लक्षात न आल्यामुळे पाचपुते यांची गाडी ड्रायव्हर साईडने ट्रकच्या मागील बाजूस जाऊन आदळली. 

परंतु त्याचवेळेस पाचपुते यांच्या गाडीचे एअर बॅग उघडल्यामुळे गाडीतील कुणालाच दुखापत झाली नाही.चालकासह सर्वजण सुखरूप आहेत. या अपघातानंतर माजी मंत्री पाचपुते एका खासगी वाहनाने पुण्याला गेले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.