माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या कारचा भीषण अपघात,पाचपुते सुखरूप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माजी मंत्री बबनराव पाचपुते भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. त्यांच्या गाडीला शिरुरजवळ भीषण अपघात झालाय.पाचपुते यांच्या गाडीला रात्री 10.30 च्या सुमारास शिरुरजवळ कानीफनाथ फाटा परीसरातील हाॅटेल सदगुरू वडेवाले इथं भीषण अपघात झाला. 

Loading...
पाचपुते यांची कार मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकली.पाचपुतेंची कारही ट्रकला मागील बाजूस जोरदार आदळली यात कारच्या समोरील बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचुर झालाय.परंतु, नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही ईजा झाली नाही. बातमी कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन तर अनेकांनी मोबाईलवरुन पाचपुतेंची विचारपुस करत धीर दिला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.