आयुक्त द्वीवेदी यांच्या समर्थनात नगरकर सोशल मिडीयावर सरसावले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर मनपाचे प्रभारी आयुक्त राहुल द्वीवेदी यांच्या बदलीच्या मागणीसाठी शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या नंतर आता नगरकर आयुक्त द्वीवेदी यांच्या समर्थनात सोशल मिडीयावर सरसावले असून #ISupportRahuldwiwedi ह्या Hashtag ने राहुल द्वीवेदी यांच्या समर्थनात पोस्ट केल्या जात आहेत,

मनपा आयुक्तपदाचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी स्वीकारताच सीना नदी पात्रातील अतिक्रमणे हटवून नदीचा श्वास मोकळा केला,असे काम यापूर्वी कोणत्याच आयुक्तांनी नगर मध्ये केले नव्हते, नियमात बसणारी कामे करण्याचा दंडक जिल्हाधिकाऱ्यांनी घातल्याने सेना पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शहराच्या जडणघडणीत एक महत्वाची भूमिका निभावत नगर शहरातील  “सामाजिक, क्रीडा,साहित्य,संस्कृती व पर्यटन” क्षेत्राला प्रोत्साहित करण्यासाठी सतत कार्यान्वित असणारे फेसबुक पेज @I Love  NGR ने द्वीवेदी यांच्या आजवरच्या प्रवासाबाबत व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. राहुल द्वीवेदी यांच्या या व्हिडीओला जोरदार प्रतिसाद भेटत असून आता पर्यंत एक हजाराहून अधिक लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे तसेच फेसबुक,Whatsapp वर शेअर केला जात आहे.पहा सोशल मिडीया वर नगरचे प्रभारी आयुक्त राहुल द्वीवेदी यांच्या समर्थनात शेअर केल्या जाणाऱ्या काही पोस्ट -

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.