संगमनेरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील खांडगाव ते निमगाव पागा जाणाऱ्या रस्त्यावर खांडेश्वर मंदिराजवळ एका मोटारसायकलला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने अशोक कारभारी चव्हाण (रा. पेमगिरी) हा मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.
Loading...

तालुक्‍यातील पेमगिरी येथील रहिवासी असलेले अशोक चव्हाण हे आपल्या मोटारसायकलवरून संगमनेरहून पेमगिरीकडे खांडगाव निमगाव रस्त्याने जात असताना खांडेश्वर मंदिराजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली असता त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. 


चव्हाण यांना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चव्हाण यांच्या अपघाती निधनाने पेमगिरी गावावर शोककळा पसरली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.