साईड न दिल्याच्या रागातून एस.टी. चालकास बेदम मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील माहीजळगाव जवळ स्कार्पिओ गाडीला एस.टी. बसने साईड न दिल्याच्या कारणावरून एस.टी. चालकाला जबर मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील माहिजळगाव शिवारात जामखेड-कर्जत ही एस. टी. बस (क्रमांक एम.एच.२०-डी-९०४२) घेऊन चालक हनुमंत लहाणू कदम (वय ३४) हे येत असताना टाकळीकडून जामखेडकडे जाणारी स्कॉर्पिओ गाडी (क्र. एम.एच ४२-झेड-२१४९) समोरून आली. यावेळी बस चालकाने रस्त्याच्या खाली गाडी घेतली. 

मात्र समोरून येणारी चारचाकी गाडी चालकाने रस्त्याच्या मधोमध उभी केली. यावेळी बस चालकाने गाडी बाजूने नेण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन स्कार्पिओ चालक खाली उतरला व त्याने बसचालक कदम यांना खाली खेचून मारहाण केली. त्याचबरोबर गाडीतील इतर तिघेही खाली आले व या सर्वांनी बसचालक कदम यांना जबर मारहाण केली. 


याप्रकरणी कदम यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यामध्ये चौघा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत कदम यांच्या नाकाला इजा झाली असून नाकातून रक्त वाहत होते. यामुळे त्यांचे कपडे रक्ताने माखले होते. दरम्यान, मारहाण करणारे सर्व आरोपी गाडी घेवून पसार झाले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.