वाळूचोरीचे पंचनामे न केल्यास नदीपात्रातच उपोषण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-पारनेर तालुक्यातील जवळे हद्दीत चार किलोमीटर पात्रात वर्षभरापासून अवैध वाळूउपसा चालू आहे. महसूल व पोलिस प्रशासनाला माहिती देऊनही कारवाई झाली नाही. चार ते पाच कोटींची वाळूचोरी झाली असावी. या चोरीचे पंचनामे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांमार्फत अचूक मोजमापे घेऊन व्हावेत व वाळूचोरीचे गुन्हे पोलिसात दाखल व्हावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 


Loading...
मागणी मान्य न झाल्यास २ जुलैपासून ग्रामस्थ नदीपात्रातच उपोषण करणार आहेत. दरम्यान, वाळूचोरीची तक्रार वरिष्ठांकडे केल्याच्या बातम्या छापून आल्याने संतापलेल्या तहसीलदारांनी संबंधित पत्रकार व तक्रारदारांना नदीपात्रात बोलावून या प्रकरणाशी माझा काही संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली. या प्रकरणात शासनाचा कोट्यवधींचा महसूल त्यामुळे बुडाला आहे, असे रामदास घावटे यांचे म्हणणे आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.