जागेच्या जुन्या वादातून कोर्टाजवळच वकिलास मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दावा मागे घेण्यासाठी कोर्टाजवळच एका वकिलास मारहाण करण्यात आली. प्रकाश अण्णा लोंढे असे या वकिलाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


Loading...
सतीश नंदलाला गुप्ता, मोहन मथुरादत्त जोशी व एक अनोळखी व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत. लोंढे यांचा आरोपींशी जागेचा जुना वाद आहे. लोंढे यांनी कोर्टात दावा दाखल केला आहे. 

मंगळवारी सायंकाळी लोंढे आपले काम संपवून घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी दाखल दावा मागे घे, असे म्हणत लोंढे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल एम. आय. शेख करत आहेत..
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.