महिला सरपंचालाच सरपंच म्हणा, त्यांच्या पतीला 'सरपंच' म्हणू नका !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ग्रामसभेत ग्रामसेवकांना धारेवर धरले जाते. विकासकामांबाबत प्रश्न विचारले जातात. कोणता निधी कोठे खर्च झाला, याबाबत प्रश्न असतात. हे टाळण्यासाठी ग्रामसेवकांनी ग्रामसभेच्या आधी गावात केलेली वर्षभरातील कामे नोटीस बोर्डवर लावावी, असा ठराव ग्रामसेवकांच्या मासिक बैठकीत पंचायत समिती सभापती रामदास भोर यांनी घेतला. 


Loading...
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि महाराष्ट्र दिनी ग्रामसभा असतात. गावात केलेली कामे, घरकुले, पाणीप्रश्न, कोणती काम कोणत्या निधीतून झाले, ठेकेदार कोण, किती खर्चाचे काम होते, कामाचा दर्जा अशा प्रश्नांना ग्रामसेवकाला तोंड द्यावे लागते. 

हे टाळण्यासाठी ग्रामसेवकांनी वर्षभरात केलेली कामे नोटीस बोर्डवर लावावी. त्यामुळे बोट दाखवायला जागा राहणार नाही. काम कोणत्या योजनेतून झाले, खर्च किती झाला, काम कोणी केले याची माहिती नोटीस बोर्डवर लावावी, असा निर्णय ग्रामसेवकांच्या बैठकीत झाला. 


फक्त सरपंच म्हणा !

अनेक गावांमध्ये महिला सरपंच असतात आणि त्यांच्या खुर्चीवर पती, नातेवाईक बसतात. त्यासाठी ग्रामसेवकाला जबाबदार धरले जाईल. ग्रामसेवक हे प्रशासनाचे अधिकारी आहेत. सरपंचालाच सरपंच म्हणा, त्यांच्या पतीला सरपंच म्हणू नका. आपणच सवय लावतो. ती आपल्याच अंगलट येते, असा सल्ला भोर यांनी दिला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.