पारनेर तालुक्यात विकासकामांची मालिका सुरू राहणार : आ. औटी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रमुख रस्ते व त्यावरील पुलांची कामे मार्गी लगाल्याने तालुक्यातील दळवणवळण सुलभ झाले आहेत. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, यापुढील काळातही तालुक्यातील विकासकामांची मालिका अशीच सुरू राहिल अशी ग्वाही आमदार विजय औटी यांनी दिली.

पारनेर ते कान्हूरपठार रस्त्यावरील शहरातील मनकर्णीका नदीवरील ६३ लाख ८७ हजार रूपये खर्चाच्या पुलाचे आ.औटी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. Loading...
आ.औटी म्हणाले, दळणवळण सुलभ झाले की, विकासची प्रक्रीय जलद गतीने होण्यास मदत होते. त्याच दृष्टीकोणातून तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची कामे व त्यावरील पुलांची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश रस्ते व त्यावरील पुलांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामेही मार्गी लावण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. 

सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठे काम करण्यात आले असून, त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास चांगली मदत झाली आहे.


आडविण्यात आलेल्या या पाण्याचा शेतीचे जलसिंचन तसेच पिण्यासाठी होणार असूनदरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी सुरू कराव्या लागणाऱ्या टँकरच्या संख्येत त्यामुळे मोठी घट झाली आहे. आडविण्यात आलेल्या पाण्याचा नागरीकांनी काटकसरीने वापर करण्याचे आवाहन आ. औटी यांनी केले

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.