श्रीगोंद्यात स्वस्तात सोने देणाऱ्या दोन महिलाना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा पोलिसांनी बुधवारी दोन ठिकाणी कारवाई करीत स्वस्तात सोने विकणाऱ्या टोळीतील दोन महिला आणि दुसऱ्या घटनेत रस्तेलूट करणाऱ्या टोळीतील दोन तरुणांना अटक केली आहे. या दोन्ही ठिकाणाहून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  


Loading...
बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास श्रीगोंदा शहरानजीकच्या मांडवगण रस्त्यावरील गणपती मळा परिसरात काहीजन दबा धरून बसल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार,उपनिरीक्षक महावीर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वाघ, दादा टाके, उत्तम राऊत, अमोल शिंदे हे त्या ठिकाणी पोहोचले. 

पोलिसांना पाहिल्यानंतर या टोळीने पळून जाण्याचा प्रयत्न केल. मात्र त्यातील आकेश अजिनाथ काळे व आणखी एका केडगाव येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलाला पकडले. यांनी पळून गेलेल्या इतर आरोपींची नावे पोलिसांना दिली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 


या दोघांकडून मिरची पावडरची पुडी, नायलॉन दोरी असे दरोडा टाकण्याचे साहित्य आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दरोडा टाकण्याच्या तयारी बाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


तर दुसऱ्या कारवाईत पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे सहकाऱ्यांसह बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घायपतवाडी येथून जात असताना तेथील झुडपाच्या आडोशाला दोन महिला संशयित दिसून आल्या. पोलीस वाहन पाहून पळणाऱ्या महिलांना महिला कॉन्स्टेबलने पकडले. 


वैशाली रामदास चव्हाण (वय २१) व सारिका नितीन चव्हाण(वय २२, दोघी रा.गुंडेगाव, ता.नगर) या दोघींना पकडले. या महिलांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे एक किलो वजनाच्या पिळ्याच्या बनावट अंगठ्या मिळून आल्या. 


त्या महिला मुंबई येथील इसमांना पाच लाखाला एक किलो सोने देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईत पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे, महिला कर्मचारी अविंदा जाधव आदी सहभागी होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.