प्लॅस्टिक बंदी विरोधात व्यापा-यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बंदी करतांना शासनाने कोणताच सक्षम पर्याय उपलब्ध करुन दिलेला नाही. त्यामुळे व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ व्यापा-यांवर आली आहे. शासनाने सक्षम पर्याय द्यावा. प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेताना शासनाने कागदी बॅगाचा पर्याय ठेवला आहे. परंतु एवढया मोठ्या प्रमाणात कागद उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार असुन त्याचा पर्यावरणालाच फटका बसेल. 

Loading...
राज्यातील प्लॅस्टिक रिसायकलींग उद्योगाला आधीच नोटा बंदीमुळे मोठा फटका बसला असुन त्यातुन सावरत असतांनाच शासनाने या उद्योगावर बंदी आणुन दुसरा घाव घातला आहे. प्लॅस्टिक बंदीचा सर्वात मोठा फटका सामान्य नागरिकांना बसला असल्याने प्लॅस्टिक बंदी हा पर्यायच होऊ शकत नाही, अशी ठाम भुमिका अहमदनगर प्लॅस्टिक उद्योग असोसिएशनने मांडली आहे.
प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध करुन द्यावा. 50 मायक्रॉन पेक्षा अधिक जाडीच्या बॅगा चालू ठेवाव्यात. व्यापा-यांवरील दंडात्मक कारवाई शिथील करावी या मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा व्यापारी असोसिएशन, अहमदनगर शहर खाद्य पदार्थ व्यवसायिक संघटना, गंज बाजार – मोची गल्ली, रिटेल व्यापारी असोसिएशन, च्या वतीने गुरुवारी सकाळी 11 वा. भिंगारवाला चौक येथुन व्यापा-यांनी संघटित होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला सदर मोर्चा मधील मागणीचे निवेदन आर.डी.सी. पाटील यांना देण्यात आले.

या मोर्चात कापड, भांडे, खाद्य पदार्थ विक्रेते तसेच सर्वच स्थरावरील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र प्लॅस्टिक उत्पादक असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश गांधी, भाजपा युवा मोर्चा व्यापारी आघाडीचे प्रमुख अविनाश साखला, ईश्‍वर बोरा, पियुश लुंकड, नितीन जोशी, तुलसीबाई पालीवाल, जयेश चंदे, रमेश लुंकड, राहुल धोकरिया, जितेंद्र गुगळे, निलेश गुगळे, मिठाई असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन खंडेलवाल, सचिन जग्गड, विजय चोपडा, मयुर जामगावकर, दिनेश गोयल, ओमप्रकाश बायड, विकी नारंग, संतोष ठाकुर, अशिष पटेल, पंकज पंड्या यांच्यासह आदी व्यापारी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.