अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी आरोपीस पोलिस कोठडी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अल्पयवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी आरोपी प्रदीप शिवाजी रासकर (रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अ.नगर) याला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दि. २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की दि. २३/६/२०१८ रोजी आरोपी प्रदिप रासकर याने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अव्हेटर गाडीवर बसवून पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे नेले. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात रासकर याचेविरुद्ध भादवि ३६३/ ३६६/ ३५४ (अ) (१) बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 


या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती देवडकर यांनी करुन आरोपी रासकर याला बुधवारी (दि. २७) अटक केली त्याला गुरुवारी (दि. २८) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल ॲड. मंगेश दिवाणे यांनी युक्तीवाद केला की, आरोपीने गुन्ह्यात वापरलेली ॲव्हेटर गाडी हस्तगत करावयाची आहे. 


आरोपी शिक्रापूर येथे कोठे वास्तव्यास होता त्याचा तपास करावयाचा आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास करावयाचा आहे. तरी आरोपीला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी रासकर याला दि. २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.