नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे विजयी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नाशिकमधून शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे यांचा पराभव केला. हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी झाली. 

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी भाजपावर मात केली, तर लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांनी विजयाची हॅट्ट्रिक करून, शिक्षक मतदारसंघावरील आपले वर्चस्व सिद्ध केले. कपिल पाटील यांच्या पराभवासाठी भाजपा व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. 

Loading...
मात्र, पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत त्यांनी भाजपाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. कपिल पाटील यांच्यासमोर भाजपाचे अनिल देशमुख, सेनेचे शिवाजी शेंडगे होते. कपिल पाटील यांना 4050, शिवाजी शेंडगेंना 1736 तर अनिल देशमुख यांना 1124 मते मिळाली आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.