नगरसेवकाच्या खूनप्रकरणी शत्रुघ्न गव्हाणे याला अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर येथील माजी नगरसेवक आयुब शेख खूनप्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने शत्रुघ्न गव्हाणे याला मंगळवारी अटक केली. बुधवारी न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

माजी नगरसेवक व मुळा-प्रवरा वीज संस्थेचा संचालक आयुब शेख यांचा आठ वर्षांपूर्वी ८ जानेवारी २०१० टोळीयुद्धातून गोळ्या घालून खून झाला. तपास सीआयडीकडे होता. नऊ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने रिजवान फारुक शेख व शोएब ऊर्फ सईद उस्मान सय्यद यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. Loading...
जुबेर अश्पाक शेख, अब्दुल अब्बास खान पठाण, बाळू ऊर्फ रवींद्र राजेंद्र त्रिभुवन, राजू ऊर्फ राजेंद्र भानुदास भालेराव, संदीप वाघमारे व नीलेश सुरेश आल्हाट यांची निदोष सुटका करण्यात आली. याविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते. 

आयुब शेखच्या खूनप्रकरणात गव्हाणे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने या विभागाचे उपअधीक्षक के. पी. यादव व हवालदार रमेश कालंगडे यांनी त्याला अटक केली. दरम्यान, खटल्यातील वसीम गुलाब शेख फरार असल्याने त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्याची सुनावणी सध्या सुरु आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.