नगर- पुणे महामार्गालगत उसाच्या शेतात मृतदेह आढळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पुणे-नगर महामार्गालत बाह्यवळणा नजीक उसाच्या शेतात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत डॉ.बिपिन बोरा यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. 

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.बोरा यांची पुणे-नगर महामार्गालगत शेतजमीन असून या शेतजमीनीत त्यांचे उसाचे पिक आहे. ही शेतजमीन करण्याकरीता सर्जेराव पैठणे हा गेल्या 15 वर्षांपासून काम करत आहे. 

Loading...


बुधवारी (दि.27) सकाळी 11.45 च्या सुमारास शेतमजूर सर्जेराव पैठणे यांनी फिर्यादी डॉ.बोरा यांना फोन करुन शेतजमीनीत उसात पहिल्या सरीत एक इसम मयत अवस्थेत आढळून आल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी शेतात जाऊन पाहिले असता एक अनोळखी 50 ते 55 वयाच्या इसमाची कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

मयताचा डावा पाय कुरतडलेला आणि चेहरा कुजला असल्याने ओळखू येत नसल्याचे दिसले. फिर्यादी यांनी शिरुर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिल्यानंतर शिरुर पोलीस स्टेशनला या गुन्ह्याची नोंद केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.