माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या नातेवाईकाची हत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते चिदंबरम यांचे नातेवाईक शिवमूर्ती यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली. शिवमूर्तीचे मित्राच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध होते. हेच हत्येमागील कारण ठरले. 

Loading...
होजिअरी कारखाना चालवणारा शिवमूर्ती सोमवार पासून बेपत्ता होता. कुटुंबाने मंगळवारी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शिवमूर्तीच्या कारमध्ये लावलेल्या जीपीएस प्रणालीद्वारे त्याच्यावर निगराणी ठेवली. 

अम्बुर तालुक्यात मंगळवारी रात्री कारचा शोध घेण्यात आला. त्यामधील तीन लोकांची चौकशी करण्यात आली. शिवमूर्तीने अपहरण व हत्येची कबुली दिली आहे. हत्येमध्ये शिवमूर्तीचा मित्रही सामील होता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.