राहुरीत साडीच्या पदराने गळफास घेत तरुणाची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील विशाल गोरख इघे (१९) या अविवाहित तरूणाने गावातील मारूती मंदिराजवळील आंब्याच्या झाडाला साडीचा पदर बांधून गळफास घेतला. सकाळी ग्रामस्थांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत विशालला पाहून पोलिसांना कळवले. 

आत्महत्या झाल्याची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने झाडावर लटकलेला मृतदेह खाली काढून राहुरीच्या शवविच्छेदन केंद्रात हलवण्यास मदत केली. दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

Loading...

विशाल हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. बारागाव नांदूर येथे मोलमजुरी करून इघे कुटुंबाची उपजीविका सुरू आहे. सहा वर्षांपूर्वी इघे कुटुंबातील मोठ्या मुलाचा नगर-मनमाड राज्यमार्गावरील राहुरीच्या जुन्या कोर्टाजवळ अपघाती मृत्यू झाला होता. 


दुसरा कर्ता मुलगा विशालने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे वयोवृद्ध आई-वडील व लहान भावावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुपारी बारागाव नांदूर येथील स्मशानभूमीत विशालवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.