घरगुती वादातून शिर्डीत मुलीच्या आई वडीलांनी केला दिराचा खून


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी पतीला सोडचिठ्ठी देऊन माहेरच्या मंडळींनी मुलीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आग्रह केला असता विरोध केल्याने सहाजणांनी शिर्डी येथील बाजारतळावरून दिरास रिक्षात घालून लाथाबुक्यांनी जीवे मारल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Loading...

कीर्ती दोगऱ्या चव्हाण (१७, लक्ष्मीनगर) हिने फिर्यादीत म्हटले आहे, २६ ला दुपारी शिर्डी बाजारतळावर समाजाच्या बैठकीत पतीला सोडचिठ्ठी देऊन माझी आई मंदा, वडील वायसर जीमदा काळे, भाऊ शरद, चुलते कल्या, राम शेट्या आमऱ्या भोसल्या, विनोद राम शेट्या भोसल्या (सर्व खडकी, ता. नगर) हे मला माहेरी नेत असताना दीर शाहरुख शिवराम चव्हाण (कोपरगाव) याने विरोध केल्याने तू आम्हाला विरोध करतो काय, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रिक्षामध्ये घालून जीवे मारून कोपरगावमधील आमच्या घराजवळ आणून टाकले. फिर्यादीची आई मंदा वायसर काळे हिला पोलिसांनी अटक केली. तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.