श्रीगोंद्यात वाळू चोरल्याच्या संशयावरून युवक व त्याच्या आईला मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वाळू चोरल्याच्या संशयावरून श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील संतवाडी येथे २३ वर्षांच्या युवकाला व त्याच्या आईला वाळूतस्करांनी बेदम मारहाण केली.संतवाडी घोडनदीशेजारी आहे. नदीपात्रात रात्रं-दिवस वाळूतस्करी होते. रात्री जेसीबीने नदीच्या कडेला किंवा शेजारील जंगलात वाळूचा साठा केला जातो. 


Loading...
बुधवारी दुपारी दत्तात्रेय अशोक मोरे व मंगल अशोक मोरे या दोघांना वाळू चोरुन नेल्याच्या संशयावरून संभाजी पवार, मच्छिंद्र पवार (तांदळी, शिरूर), शेखर घोलवड, दत्ता हजारे, सतीश घोलवड, लखन शेजवाल (काष्टी) यांनी गज व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. मंगल मोरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.