पारनेर तालुक्यातील निळोबाराय देवस्थानात दोन दिंड्या काढण्यावरून वाद


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यातील वारकऱ्यांना आषाढीवारीचे वेध लागले असताना पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबाराय देवस्थानात दोन दिंड्या काढण्यावरून वाद रंगला आहे. 

दोन दिंडी सोहळ्यांना देवस्थान ट्रस्टने यंदा विरोध केला असून बेकायदेशीर निघणाऱ्या दिंडीवर जिल्हा प्रशासनाने बंदी घालावी, अशी मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली अाहे. 


Loading...
देवस्थानच्या वतीने सुरू केलेल्या पायी दिंडी सोहळ्यात एकत्र सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील पाचवे संत म्हणून ओळख असलेले संत निळोबाराय यांची श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे समाधी आहे. 

तेथे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मागील दहा वर्षांत ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे सरकारने येथील विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करून हा परिसर सुशोभीत व सर्व सुविधायुक्त केला आहे. 

गेल्या वर्षापासून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माउलींच्या दिंडी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र पिंपळनेर येथून संत निळोबारायांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आले.
मात्र, देव स्थानबरोबर येथील सोपानराव औटी यांनी संत निळोबारायांचा वेगळा दिंडी सोहळा सुरू केला. 

एकाच ठिकाणाहून वेगवेगळे दोन दिंडी सोहळे नकोत, यावर अनेकदा विचारमंथन झाले. वेगळी दिंडी न काढता देवस्थानच्या सोहळ्यात सामील होण्याचे आवाहन व विनंती सोपानराव आैटी ट्रस्टने केली. मात्र, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. यंदाही त्यांनी दिंडी सोहळ्याची तयारी सुरू केल्याने देवस्थान व स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.