अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक राहणेला संगमनेरमध्ये अटक .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक, गँगस्टर रामदास राहणे याच्या मुसक्या मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने संगमनेरमध्ये आवळल्या. 


Loading...
एका व्यावसायिकाच्या खंडणी प्रकरणात राहणेचा सहभाग असल्याचे समाेर अाल्याने दाऊदचे संगमनेर कनेक्शन उघड आले. शुक्रवारी (२२ जून) संगमनेरमध्ये ही कारवाई झाली, तरी स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती नव्हती. राहणेला ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात अाली. 

खंडणीविरोधी पथकाने मुसक्या आवळलेला राहणे याने दाऊद टोळीसाठी अनेक गुन्हे केले. २०११ मध्ये मुंबईतील व्यावसायिक ढोलकिया यांच्या कार्यालयावर झालेल्या गाेळीबारात त्याचा हात होता. मुंबई आणि गुजरातमध्ये त्याच्याविरोधात ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.