माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे 29 जूनला मेळावा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मुख्‍यालय आमर्ड कोर सेंटर स्‍कूल (एसीसीएस),अहमदनगर यांच्‍या वतीने दिनांक 29 जून रोजी श्रीगोंदा तालुक्‍यातील कोळगाव येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत हा मेळावा होणार असून जिल्ह्यातील वीरनारी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, विधवा पत्‍नी व अवलंबिता यांचे विविध प्रश्न यांत सोडविण्यात येणार आहेत.
Loading...
या मेळाव्‍यात माजी सैनिकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या पेन्‍शन विषयी, जमिनीविषयी तसेच पोलिस तक्रारीविषयीच्‍या अडीअडचणी सोडविण्‍यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्यासाठी येताना संबंधितांनी त्यांची कागदपत्रे दोन प्रतीत सोबत ठेवावीत. 

यावेळी सीएसडी कॅन्‍टीन, वैद्यकीय उपचार आदींची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुका व जिल्ह्यातील सर्व वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, विधवा पत्‍नी व अवलंबित ( निवृत्‍ती वेतनधारक) यांनी या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन एसीसीएसचे शिक्षणाधिकारी लेफ्टनंट कर्नल जयदीप कृष्णन यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाशी निगडीत माजी सैनिकांचे काही प्रश्न असतील तर त्याची सोडवणूकही या मेळाव्याद्वारे करण्यात येणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.