व्यापाऱ्यांसमोर सरकार नमलं,अवघ्या चार दिवसातच प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यात उद्यापासून प्लास्टिकबंदी शिथिल होणार आहे. प्लास्टिक बंदी संदर्भात छोट्या व्यापाऱ्यांसमोर सरकार नमल्याचं चित्र समोर आलंय. किराणा आणि इतर दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सुट्ट्या वस्तू बांधून देऊ शकतात. त्यासाठी नवं परिपत्रक काढण्यात येणार आहे.

Loading...
किराणा दुकानावरच्या पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार आहे. ब्रँडेड आणि मोठ्या पॅकेजिंग उत्पादकांप्रमाणे किरकोळ दुकानदारांनाही दिलासा देण्यात आला आहे. मसाला, साखर, तांदूळ, तेल यांसारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी रिटेल पॅकेजिंगवरची बंदी उठवण्याची घोषणा रामदास कदम यांनी केली. 

ग्राहकांना प्लास्टिक पिशवी वापरण्यासाठी बंदी आहे. मात्र किराणा दुकानातील पॅकेजिंग वस्तूंसाठी हा निर्णय असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं. दरम्यान, अटी-शर्तींसह बंदी उठवण्यात येणार असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.