शिवसेनेला आयुक्त राहुल द्विवेदी नकोसे,मुख्यमंत्र्यांची घेणार भेट !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पदभार स्वीकारताच धडाकेबाज कामगिरीने अल्पावधीतच नगर शहरातील जनतेच्या मनात स्थान मिळवलेले जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांचा सेनेला अडसर होतो आहे.त्यामुळे त्यांच्या बदली साठी सेनेने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे.

नियमात बसणारी कामे करण्याचा दंडक जिल्हाधिकाऱ्यांनी घातल्याने पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्ष अडचणीत सापडला आहे .
Loading...
याबाबत वृत्त दैनिक सकाळ ने प्रकाशित केले आहे,यात सांगितले आहे कि,महापालिका आयुक्त पदाचा प्रभारी कारभार जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्याकडे असून त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे सत्ताधारी शिवसेना-भाजप युती अडचणीत आल्याची भावना व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईत पोहोचले, तथापि त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही त्यांच्या भेटीसाठी आज दुपारी दीडची वेळ मिळाली असून त्यात जिल्हाधिकार्यांविषयी नाराजी व्‍यक्त करण्‍यात येणार आहे.

सेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम,उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृहनेते गणेश कवडे, महापौरांचे पती संभाजी कदम यांच्यासह काही कार्यकर्ते काल मुंबईला पोहोचले मात्र आयुक्ताविरोधातील भावना व्यक्त करण्यासाठी आग्रही असलेल्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही ते व्यस्त असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.