देशाला सद्य परिस्थितीत शाहु महाराजांचे विचारच वाचवु शकतात- कॉ.बहिरनाथ वाकळे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्वातंत्र्यपुर्व काळात जी परिस्थिती निर्माण केली होती म्हणजेच फोडा, तोडा आणि राज्य करा ती परिस्थिती आज पुन्हा निर्माण केली गेली आहे.ती संपविण्यासाठी आज पुन्हा देशाला शाहु महाराजांचे विचारच वाचवु शकातात, असे प्रतिपादन अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाचे उपाध्यक्ष कॉ.बहिरनाथ वाकळे यांनी केले.

राजर्षी शाहु महाराज यांच्या 144 व्या जयंती निमित्त अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळ, मखदुम सोसायटी, मराठा सेवा संघाच्या वतीने माणिक चौकयेथील मखदुम कार्यालयात शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 


Loading...
याप्रसंगी रहेमत सुलतान फाऊंडेशनचे अध्यक्षयुनुसभाई तांबटकर, मुस्कान असोसिएशनचे सय्यद शफाकत, मराठा सेवा संघाचे इंजि.अभिजीत वाघ, इतिहास प्रेमी मंंडळाचे आसिफ दुलेखान, रोहितवाळके, शेख फिरोज, संध्या मेढे, यशवंत तोडमल, दिपक शिरसाठ, कॉ.योगेश महाराज आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना कॉ.वाकळे म्हणाले कि, राजर्षी शाहु महाराज यांना पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यास विरोध करणारी विचारसणीचेलोक आज शिवाजी महाराज यांचा सिंहासन बसविण्याची घोषणा करत आहे. आज बहुजनानीं राजर्षी शाहु महाराज समजुन घेऊन जाती जातीत वादलावणार्‍या शक्तीला दुर ठेवले तरच बहुजनांचा विकास होऊ शकतो असे सांगितले.

यावेळी प्रास्तविकात मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीदखान दुलेखान म्हणाले कि, शाहु महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेषभर दिला. त्यांनी कोल्हापुर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणुन त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यतानष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी 1919 साली स्वर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरविण्याची पद्धत बंद केली.

जाती भेद दुर करण्यासाठी त्यांनीआपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. 1917 साली त्यांनी पुनरविवाहचा कायदा करुन विधवा विवाहाला कायदेशीरमान्यता मिळवुन दिली, असे सांगितले.
कार्यक़्रमाचे सुत्रसंचालन रोहित वाळके यांनी केले. तर आभार असिफ दुलेखान यांनी मानले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.