पारनेर मध्ये एसटी-कार अपघातात नगरमधील पती-पत्नी ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील भाळवणी जवळ कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर दुपारी एक च्या दरम्यान एस.टी. बस व कार यांच्या भीषण अपघातात नगरमधील दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीला पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. पंकज शहा व त्यांची पत्नी रुपाली शहा (रा-नवजीवन काँलनी,अहमदनगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्यची नावे आहेत. याविषयी सविस्तर माहिती अशी की, भाळवणी पासून एक किमी अंतरावर कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर गोरेगाव फाट्याजवळ माळकुप शिवारात नगरहून कल्याणकडे जात असलेल्या गेवराई-भिवंडी एस.टी. बस क्रमांक एम.एच. २० बी.एल. ३०६६ व कल्याणहून नगरकडे जात असलेल्या एम.एच. १६ बी.एच. ७७४३ या क्रेटा कंपनीच्या कारचा समोरासमोर अपघात होऊन कारमधील पंकज शहा व त्यांची पत्नी रुपाली शहा यांचा मृत्यू झाला.

Loading...
तर कार चालकास उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. अपघात झाल्याचे कळताच पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, पोलीस हे.काॅ. आण्णा चव्हाण, शेख, गायकवाड यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती समजताच भाळवणी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पारख व माळकुप परिसरातील तरुणांनी अपघात ग्रस्तांना हलविण्यासाठी मदत केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.