नगर मध्ये जुगार अड्ड्यावर छापा, ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर ग्रामीण विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक मनिष कलवाणीया यांच्या पथकाने कोठला परिसरात जुगार अड्डयावर छापा टाकत १७ जणांवर कारवाई केली असून या छाप्यातून ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहाय्यक पोलिस अधिक्षक मनिष कलवाणीया यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोठला परिसरात तिरट नावाचा जुगार खेळला जात आहे. 

त्यानूसार श्री.कलवाणीया यांच्या पथकातील पोसई क्षिरसागर, स.फौ. कल्याण शेळके, पो ना गणेश धुमाळ, पोना साबीर शेख, यांनी कारवाई करीत १७ जणांना ताब्यात घेतले. 

यावेळी ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तोफखाना पेालिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.