जिल्हा विभाजनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार -ना. शिंदे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागावा, जिल्हा मुख्यालय श्रीरामपूर व्हावे यासाठी मृद व जलसंधारण, राजशिष्ठाचार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरावा, म्हणून श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर कदम यांच्या समवेत समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे तसेच सदस्य अशोक पटारे, बाबा इनामदार, मच्छिंद्र कदम आदींनी अहमदनगर येथे भेट घेण्यात आली. 

Loading...
साडेतीन वर्षांपूर्वी समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून सामाजिक भावनेने सर्वांनीच परिश्रम घेतल्याने जिल्हा विभाजनाचा तीन दशकांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अंतिम टप्प्यात आलेला आहे.

अध्यक्ष भोसले, कार्याध्यक्ष बाबासाहेब औताडे हे वैयक्तिक कामानिमित्ताने अमेरिकेला गेलेले असल्याने राजेंद्र लांडगे यांनी ना. शिंदे यांना जिल्हा मुख्यालयासाठी श्रीरामपूर हे ठिकाण कसे योग्य आहे, या संबंधीची व समितीने आजपर्यंत केलेत्या विविध उपक्रमांची सविस्तरपणे माहिती दिली.

जिल्हा विभाजनाचा दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न गुणवत्तेच्या आधारे मार्गी लागावा म्हणून पालकमंत्री स्वत: आग्रही असून त्यांनी सर्वांनाच विश्वासात घेण्याबाबत दुजाराही दिला. याप्रसंगी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने सत्कार करून निवेदनाद्वारे त्यांना श्रीरामपूर भेटीचेही निमंत्रण दिले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.