डॉक्टरसह आई वडिलांविरोधात पत्नीचा छळ केल्याचा गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कोल्हार येथील डॉ. विक्रम नालकर व त्यांच्या आई वडिलांविरोधात त्यांच्या पत्नीने मानसिक व आर्थिक छळवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. विक्रम अशोक नालकर (वय ३८), अशोक दादाजी नालकर (वय ६५), अनिता अशोक नालकर (वय ५८, सर्व रा. कोल्हार तिसगाववाडी, ता. राहाता) यांच्या विरोधात पत्नीचा छळ केल्याचा गुन्हा लोणी पोलिसात दाखल करण्यात आला आहे. 

डॉ. मनीषा विक्रम नालकर (रा. तिसगाव वाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की २००९ साली दोघा उभयतांचा विवाह झाला होता. विवाहापूर्वीपासून डॉ. नालकर यांचे एका महिलेशी प्रेमप्रकरण असून महिलेला ५ वर्षांचा मुलगा आहे. याबाबत डॉ. मनिषा यांना त्यांच्या सासुने लग्नानंतर कल्पना दिली होती.

Loading...
तसेच या महिलेस आम्ही समजावून सांगून तिला तिच्या पतीकडे पाठविले आहे, असेही सांगण्यात आले होते. लग्नानंतर डॉ. नालकर यांनी पत्नीस पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यास सांगितले. तरच आपले संबंध ठिक राहतील, असे बजावले. त्यानंतर पुणे येथे डॉ. मनिषा यांनी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात स्त्री रोग तज्ज्ञ हा डिप्लोमा केला.

सध्या पारनेर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करावी लागत आहे. तसेच कोल्हार येथील आरोग्य केंद्रात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणूनही नोकरी केली; परंतु बाळंतपणानंतर मनिषा यांना मानसिक त्रास देण्यात आला व घटस्फोटाची नोटीस पाठविण्यात आली.

दरम्यान डॉ. विक्रम यांनी कोल्हार येथे दवाखाना व घर बांधले. तसेच तू घरी यायचे नाही अन्यथा तुझी गडचिरोली येथे बदली करील, असा दम दिला. विक्रम यांनी त्या महिलेस दोन मुलांसह घरी आणून ठेवले असून त्यांना घराबाहेर काढावे, त्यांच्या पासून जीवितास धोका असून सासु व सासऱ्यांनीही आर्थिक व मानसिक छळ केला आहे.

नोकरीवर गदा आणून राजकीय वापर करून धमक्या देत आहेत, अशी तक्रार डॉ. मनिषा नालकर यांनी लोणी पोलिसांत दिली आहे. यावरून लोणी पोलिसांत गुन्हा रजि नं १३०/१८ प्रमाणे कलम ४९८ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.