चिकन खाताय,सावधान!, कोंबड्यांचं वजन वाढवण्यासाठी अवैधरित्या इंजेक्शन!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मनसोक्त चिकन झोडणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे, चिकनसाठी वापरल्या जाणाऱ्या कोंबड्यांचं वजन वाढवण्यासाठी कोंबड्यांना अवैधरित्या अँण्टीबायोटिक्स देत असल्याची धक्कादायक माहिती मुंबई हायकोर्टातील एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पुढे आली आहे. 

सध्या दुधासहीत सर्वच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आढळून येत असल्याने सिटीझन सर्व्हिस फॉर सोशल वेलफेअर अँण्ड एज्युकेशन या सेवाभावी संस्थेतर्फे मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली आहे. त्याच्या सुनावणी दरम्यान ही बाबसमोर आली आहे.

Loading...
याचिकाकर्त्यांनी ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आहे. अशाप्रकारे इंजेक्शन दिलेल्या चिकनच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत. जनावरांसाठीच्या कुठल्याही औषधासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असतानाही बाजारात सर्रासपणे ही औषधे विकली जात असल्याची बाबसमोर आली आहे.

हा प्रकार गंभीर असून सरकारला याचे काहीच सोयरसुतक नाही का अशा शब्दात शासनाला हायकोर्टाने खडसावलंय. एवढंच नाही तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय यापुढे अशा औषधांची विक्री केली जाऊ नये यासाठी सरकारला खबरदारी घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.