पावसाचे माहेरघर भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मान्सूनची धमाकेदार एंट्री !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मान्सुनचे धमाकेदार आगमन झाले असून हा पाऊस सर्वदूर व्यापला आहे. काल सकाळी सहा वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपयंर्त भंडारदरा येथे २० मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.

मागील वर्षी पावसाने वेळेवर आगमन केले होते. सगळीकडेच पावसाने हाहाकार माजविला होता. परिणामी भंडारदरा धरण जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरुन धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता मिटल्या होत्या.

मात्र यावर्षी भंडारदरा धरणाच्या पाणलोटात बरोबर १ जून रोजी वरुणराजा बरसल्यानंतर २० ते २५ दिवस गायब झाला होता. बुधवारी रात्रीपासून पावसाच्या कमी जादा प्रमाणात सरीवर सरी कोसळत असून पावसाचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसत आहे.

Loading...
या पावसामुळे आदिवासी शेतकरी बांधवांनी पेरलेली भाताची रोपे पुन्हा तरारुन हिरवीगार दिसू लागली आहे. तर रतनवाडी, घाटघर, वाकी, पांजरे याही परिसरात पावसाने चांगली सुरुवात केली असून परिसरातील डोंगरदऱ्यामधून पाण्याचे लोंढे भंडारदरा धरणाच्या दिशेने आगेकुच करत आहे.

गेल्या २४ तासात भंडारदरा येथे ५७ मी. मी. पावसाची नोंद झाली असून रतनवाडी येथे ६४ मी. मी., घाटघर येथे ६५ मी. मी., पांजरे येथे ६२ मी. मी. तर वाकी येथे ४२ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा धरणाचा सध्याचा पाणीसाठा २८२३ दलघफु असून भंडारदरा धरणात १२ तासात नव्याने ३४ दलघफु पाण्याची आवक झाली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.