राहुरीत रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी शहर येथील जाॅन साळवे या तरुणाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास शहरातील राजवाडा परिसरात ही घटना घडली. 

जाॅन रिक्षा चालवून चरितार्थ चालवत होता. घरी आल्यानंतर वरच्या मजल्यावर खोलीत गेलेला जाॅन बराच वेळ बाहेर न पडल्याने घरातील मंडळीनी दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडून नातेवाईकांनी आत प्रवेश केला असता साडीने गळफास लावून आत्महत्या केलेल्या अवस्थेत जाॅन दिसला.

Loading...
त्याच्यामागे दोन मुले, पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार असून त्याच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जाॅनने नेमके कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.