शिर्डीत स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :खोदकाम करताना पाच किलो सोन्याचे नाणे सापडले असून ते कमी किमतीत विकायचे असे सांगून एकास ५० लाख रूपयांना लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत तिघांविरूद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Loading...
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, इंद्रकुमार मंगतराम बक्षी (रा. नवी दिल्ली) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. ५ ते ११ जून २०१८ या कालावधीत साईमंदिराच्या गेट नंबर दोन समोरील हॉटेल नवजीवन समोर आरोपी विनोद (पूर्ण नाव माहित नाही) व त्याच्या तीन साथीदारांनी खोदकाम करताना आपल्याला पाच किलो सोन्याचे नाणे सापडले असून ते विकायचे असल्याचे आपल्याला सांगितले.

गुन्ह्यातील आरोपींनी बक्षी यांना त्यातील एक नाणे तपासणीसाठी दिले. सदर नाणे खरे असल्याने बक्षी यांना आरोपींनी सोन्याचे नाणे घेण्याची तयारी दाखविली. त्यानंतर आरोपींनी बक्षी यांना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे ५० लाख रूपये घेवून बोलावले. बक्षी पैसे घेवून घोटी येथे गेले असता आरोपी विनोद व त्याच्या तीन साथीदारांनी बक्षी यांना मारहाण करून त्यांच्याकडील ५० लाख रूपये जबरदस्तीने हिसकावून घेवून पलायन केले.

बक्षी यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध गु.र.नं. १३०/२०१८ भादंवि ३९२, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जगदिश मुलगीर करीत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.