विरोधकांकडून माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न - आ. शिवाजी कर्डिले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राजकारण करताना कधीही जात धर्म पाहिला नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. गुंडगिरी, दडपशाही कधीच केली नाही. पाचवेळा पाच पक्षांच्या चिन्हांवर निवडून आलो. हे लोकांचे प्रेम आहे.सलग पाच वेळा वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हावर निवडून येणे, ही सोपी गोष्ट नाही. चुकीचे वागलो असतो, चुकीचे केले असते, तर सर्वसामान्य जनतेने कधीच घरी बसवले असते. 

Loading...
माझ्याकडे कोणताही साखर कारखाना नाही, मोठा उद्योग नाही, केवळ चोवीस तास जनतेच्या सुख, दुःखात सहभागी होऊन विकासकामे मार्गी लावतो. त्यामुळे विरोधकांनी माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप आ. शिवाजी कर्डिले यांनी केला. तिसगाव (ता. पाथर्डी) येथे उपसरपंच फिरोज पठाण मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात आ. कर्डिले बोलत होते.

यावेळी तिसगावातील दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आ. कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, दीपक लांडगे, तालुका विकास अधिकारी सुभाष वळढेकर, माजी नगरसेवक संजय भागवत, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब लवांडे, माजी सरपंच भाऊसाहेब लोखंडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.