प्लास्टिक विरोधात मनपाची कारवाई, ७० हजारांचा दंड वसूल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्लास्टिक बंदीच्या निर्णयाच्या तिसऱ्या दिवशी नगर शहरात महापालिके कडून कारवाई सुरूच राहिली. राज्य सरकारने प्लास्टिक बंदीच्या निर्णय तीन दिवसापूर्वी लागू केला. या निर्णयाचे सर्वसामान्यांकडून जोरदार स्वागत झाले आहे.

प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने गेल्या तीन दिवसांपासून शहरात कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या तीन दिवसात चौदा  जणांवर कारवाई करण्यात आली.


Loading...
प्लास्टिक बंदीनंतर महापालिकेने कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. भाजीविक्रेत्यांकडेही मंगळवारी प्लास्टिक पिशवी दिसली नाही.

मनपाचे पथक विविध व्यावसायिकांकडेही छापे घालून दंडात्मक कारवाई करत आहे.पाच हजारांचा भुर्दंड बसत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

सोमवारी सुशांत गांधी (भिस्तबाग), भोमसिंह राठोड (राठोड), रुद्रा बिकानेर स्वीटस् तीलाराम जाखड, राजलक्ष्मी स्वीट्स, राजपुरोहित (बिकानेर स्वीटस्) या व्यावसायिकांना पाच हजार दंड करण्यात आला.

भिस्तबाग चाैकात सुशांत कापड दुकानात रेडिमेड कपड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या आढळून आल्या. पथकाने दुकानमालकाला दंडाची पावती दाखवली. त्यानंतर व्यापारी तेथे पोहोचले.

कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी काही वेळ दुकान बंद ठेवले. दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. 

कुमार सारसर, पी. एस. बीडकर, सोमनाथ चव्हाण, ऋषिकेश वाल्मिक, संजय चाबुकस्वार या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, श्रीरामपूरमध्येही पाच व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.