पाथर्डी नगरपालिकेतील ठेकेदारीतून दोन गटांत हाणामारी,पाथर्डीत तणाव.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी नगरपालिकेतील ठेकेदारीवरुन कसबा पेठेत राहणारा पालिकेचा ठेकेदार व विद्यमान नगरसेवकाच्या भावात रविवारी तुंबळ मारामारी झाली. यात नगरसेवकाच्या भावासह पालिका ठेकेदार गंभीर जखमी झाला. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नगर येथे हलवण्यात आले. 


Loading...
संबंधित ठेकेदार व नगरसेवकांच्या गटात पालिकेच्या ठेकेदारी कामांवरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. रविवारी दुपारी दोन्ही गटांत ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्याच्या कारणावरुन कसबा पेठेतील मारुती मंदिराजवळ किरकोळ वाद झाला.

काहींच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटवण्यात आला. मात्र, सायंकाळी आंबेडकर चौकात दोन्ही गटांचे समर्थक समोरासमोर आले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. पालिकेचा ठेकेदार आपल्या ऑफिसच्या मागील बाजूने बाजार समितीच्या आवारात समर्थकांसह आला. त्याचवेळी नगरसेवकाचा भाऊ व त्याचे समर्थक जमा झाल्याने तुंबळ मारामारी झाली.

यात काठ्या, दगड, दांडके याचा सर्रास वापर झाला. या घटनेत नगरपालिकेच्या ठेकेदारासह नगरसेवकाचा भाऊ गंभीर जखमी झाला. या घटनेची शहरात बातमी पसरताच दोन्ही गटांचे समर्थक आंबेडकर चौकात जमा झाले. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला.

शहरामध्ये दंगलसदृश वातावरण निर्माण होऊनदेखील पोलिसांचे अस्तित्व दिसले नाही. दुपारी झालेल्या घटनेच्या वेळी नागरिकांकडून पोलिसांना माहिती कळवली गेली होती. त्यावेळी काही पोलिस कर्मचारी घटनास्थळी येऊन गेले. मात्र, पोलिसांना घटनेचे गांभीर्य लक्षात न आल्याने सायंकाळी ही घटना घडली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.