सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी, श्रीगोंद्यात १ जुलैला नोकरी महोत्सव.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी १ जुलैला श्रीगोंद्यात नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुराज फाउंडेशन व श्रीछत्रपती शिवाजी महाविद्यालयाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी दिली. 

Loading...
२०१३ मध्ये राजेंद्र व अनुराधा नागवडे यांच्या पुढाकाराने झालेल्या नोकरी महोत्सवात अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळाली होती. तालुक्यातील पदवीधर व व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण घेतलेल्या बेरोजगारांसाठी हा नोकरी महोत्सव आहे. उत्पादन, बँकींग, फायनान्स, कृषी, व्यवस्थापन, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान व टेलिकाॅम क्षेत्रातील तीस कंपन्या पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे सरळ भरती करणार आहेत.

शिवाय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमार्फत बेरोजगारांची नोंदणी व समुपदेशनही केले जाणार आहे. १ जुलैला श्रीछत्रपती शिवाजी महाविद्यालयात सकाळी १० वाजता आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवाचे उदघाटन आमदार डाॅ. सुधीर तांबे व जि. प. सभापती अनुराधा नागवडे यांच्या हस्ते होणार असून कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

नोकरी महोत्सव-2018 तून तालुक्यातील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना पात्रतेनुसार नोकरी,रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.तालुक्यातील नोकरी,रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींनी नोकरी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केशवराव मगर, प्राचार्य एकनाथराव खांदवे यांनी केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.