कर्जतमध्ये कंटेनरच्या धडकेने युवकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातील सौताडेवाडी येथील युवक शत्रुघ्न मारुती ढगे (वय २०) हा कंटेनरने ज़ोराची धडक दिल्याने जागीच ठार झाला. 

Loading...
ढगे हा दुचाकीवरून पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात जुन्या मुंबई हायवेने जात असताना पाठीमागून आलेल्या (एम. एच. ०६ ए. क्यू. ०६८०) या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने या अपघातात तो जागीच ठार झाला. त्याच्यावर सौताडेवाडी परिसरातील त्यांच्या शेतात शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत वडगाव मावळ पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शत्रुघ्न ढगे याच्यामागे आई, वडील, दोन भाऊ व एक बहीण, असा परिवार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.