शिर्डी बाह्यवळण रस्त्यावर कंटेनर उलटला, चालक जागीच ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता तालुक्यातील केलवड गावात शिर्डी बाह्यवळण रस्त्यावरुन शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कंटेनर उलटून अपघात झाला. या अपघातामध्ये राजस्थानचे सुंदरसिंग दवान सिंग (वय -५१) या चालकाचा जागीच मृत्यू झाला. 

Loading...
मालवाहतूक कंटेनर कोल्हापुरवरुन मनमाडच्या दिशेने जात होता. दरम्यान केलवड गावातील चौफुल्यापासुन जात असताना अचानकपणे कंटनेर पलटी झाला. 

शेजारील प्रभाकर गमे यांच्या ऊसातील शेतात पलटी झाला. अपघातात जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राहाता पोलिस त्या ठिकाणी हजर झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.