कुत्र्याने घेतला विद्यार्थ्याचा जीव,रेबीज आजाराने दहावीत प्रथम आलेल्या मुलाचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एसएससी परीक्षेत मिरजगाव केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या नागलवाडी येथील नागेश्वर विद्यालयातील विद्यार्थी दीपक मोहळकर या विद्याथ्र्याचे रेबीजच्या आजाराने दि.२३ रोजी पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. 

Loading...
सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान नागलवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या दु:खद घटनेमुळे नागलवाडी शिवारात शोककळा पसरली होती. नागलवाडी येथील नागेश्वर विद्यालयातील विद्यार्थी दीपक श्रीरंग मोहळकर हा एसएससी परीक्षेत मिरजगाव केंद्रात 95.60 गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता.

त्याला मागील काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्याने चावा घेतला होता. काही दिवसांपासून त्याला जास्त त्रास जाणू लागल्याने पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यातच त्याचे दु:खद निधन झाले. दीपक मोहळकर हा गरीब शेतकरी कुटुंबातील होता.

त्याच्यापश्चात आई, वडील, एक भाऊ, बहीण, असा परिवार आहे. दीपक मोहळकर याने अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेत कुटुंबाचे व गावाला नावलौकिक मिळवून देण्याचे स्वप्न बाळगले होते; त्याच्या निधनामुळे नागलवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.