नगर - दौंड रेल्वेमार्गाच्या गेटवर कंटेनर अडकल्याने दोन तास मार्ग बंद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बेलवंडी रेल्वे स्थानकानजिक असलेल्या रेल्वे फाटकावर दोन कंटेनर अडकल्याने पडल्याने नगर - दौंड रेल्वेमार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती. सायंकाळी सहाच्या दरम्यान यातील एक कंटेनर बाजूला घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.  

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर - दौंड रेल्वे मार्गावरील असलेल्या फाटकाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. लोणी फटकाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या मार्गावरील वाहतूक बेलवंडी रस्त्याने सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी बेलवंडी रेल्वे स्थानकानजीकच्या फाटकातून दोन कंटेनर समोरासमोर आले.

दोन्हीही वाहनचालकांनी एकाच वेळी रेल्वे मार्गावर वाहने घातल्याने दोन्ही वाहने अडकुन पडली. तब्बल दोन तास प्रयत्न करूनही वाहने निघाली नाहीत. दरम्यान यावेळी दोन्ही बाजूने वाहनाची गर्दी झाली होती. 

बऱ्याच वेळाने आजूबाजूच्या नागरिकांनी प्रयत्न करून यातील एक कंटेनर बाजूला घेतला. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. दोन्ही बाजुने रस्ता बंद झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनाची मोठी रांग लागली होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.