कोपरगाव बाजार समितीत कांदा @ १४०० रुपये.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव येथील बाजर समितीत शनिवारी दि.२३ जुन रोजी झालेल्‍या कांदा लिलावात एक नं. कांदा १४०० रुपये या उच्‍चांकी भावाने विकला गेला,अशी माहिती बाजार समिती सभापती संभाजी रक्‍ताटे यांनी दिली. 


कोपरगाव बाजार समितीत गुरूवार व शनिवार कांदा लिलावाचे दिवस असल्‍याने गुरूवारी १३०० असणाऱ्या कांद्याने शनिवारी १०० रूपयांनी उचल खाल्‍ली. व भाव १४०० रुपयांवर पोहचला.

याबाबत अधिक महिती देताना उपसभापती राजेंद्र निकोले म्‍हणाले, शनिवारी ८६३० कांदा गोण्याची आवक झाली.सकाळी ११ वाजता लिलाव सुरू झाला. त्‍यावेळी कांदा नं. १- १००० ते १४००, नं. २- ८०० ते १००० , गोल्‍टी ३०० ते ८०० जोड १०० ते ३०० रूपयांनी गेला.

चांगला भाव मिळाल्‍याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. कांदा लिलावास आणताना प्रतवारी करून गोणीत आणावा. वजनमाप होण्याच्‍या दृष्टीने कांदा शक्‍यतो आदल्‍या दिवशी आणावा. जेणेकरून लिलावाच्‍या दिवशी वेळ जाणार नाही, असे समितीचे सचिव परसराम सिनगर यांनी सांगीतले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.