शिक्षणाचा खर्च वडिलांना झेपत नसल्यानं शेतकऱ्याच्या मुलीनं संपवलं आयुष्य


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्याच्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथे घडलीये. दोन भावंडांच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नसल्यामुळं तिनं आपली जीवन यात्रा संपवलीये. अनिशा ताठे असं तिचं नाव असून ती अभियांत्रिकीचा डिप्लोमा करत होती.


माझे शिक्षण थांबले तर बहीण-भावाचे शिक्षण पूर्ण होईल, म्हणून मी माझे जीवन संपवत असल्याचा हृदयद्रावक मजकूर चिठ्ठीत लिहून तिने आत्महत्या केली.

शेतकऱ्यांची आत्महत्या आपण बघतच होतो. त्यांना त्यापासून सावरण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पण आता शेतकऱ्याच्या मुलीनंच आत्महत्या केली, हे फारच धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.