चौथीच्या विद्यार्थ्यांना दोनशे उठबशा मारण्याची शिक्षा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर रस्त्यावरील एका शाळेतील एका शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्यांना २०० उठबशा मारण्याची शिक्षा दिली. या प्रकारामुळे या विद्यार्थ्यांचे पाय सुजले असून पालकांत संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे.


शहरातील बेलापूर रस्त्याच्या बाजुला असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी (दि. २२) या शाळेतील इयत्ता चौथीची मुले गोंधळ घालत होती. त्यामुळे चिडून जाऊन या शिक्षकाने या गोंधळ घालणाऱ्या मुलांना २०० उठबशा मारण्याची शिक्षा दिली. या अघोरी शिक्षेमुळे या विद्यार्थ्यांचे पाय सुजले, यामुळे त्यांना चालता येईना, अशी परिस्थिती निर्माण झाली.

Loading...
यासंदर्भात काही पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाला जाब विचारला, मात्र व्यवस्थापनाने हात वर केले. व्यवस्थापनाच्या दबावामुळे पालक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. काल शनिवारी या वर्गातील शिक्षा करण्यात आलेले विद्यार्थी गैरहजर होते. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित शिक्षक व संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.