लहान मुले पळविणारे समजून कापड विक्रेत्यांना मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील जेऊर येथे गुरुवार, दि. २१ जून रोजी गावात कपडे विकण्यासाठी आलेल्या तरुणांना लहान मुलांना पळविणारे समजून मारहाण करण्याचा प्रकार घडला. 


Loading...
याबाबतची माहिती अशी की, जेऊर मधील कोकणवाडी परिसरात काही तरुण हातोहात कपडे विकण्यासाठी आले होते. त्यावेळी तेथे दोन वर्षाचे बालक खेळत होते. त्याला पकडण्यासाठी कपडे विकणारे तरुण फिरत असल्याचा संशय नागरिकांना आला.

या वेळी या कपडे विकणाऱ्या तरुणांना पकडून मारहाण करण्यात आली. सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तीन तरुणांना ताब्यात घऊन त्यांची अधिक चौकशी केली असता, ते झेंडीगेट (नगर) येथे वास्तव्यास असून, ते कपडे विकण्याचा व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले.

मुलांना पळविणे हा प्रकार केवळ अफवा असल्याचे सहा. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी या वेळी सांगितले.सर्वत्रच मुलांना पळविणाऱ्यांची टोळी आल्याची अफवा सोशल मीडियातून पसरत आहे. याबाबत पोलिसांकडून आवाहन करूनदेखील जेऊरमध्ये कपडे विकणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.