शनिशिंगणापूर देवस्थान शासनाच्या ताब्यात देणे योग्यच !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य सरकारने नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थानप्रमाणे ताब्यात घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. या निर्णयाचे नेवासा तालुका शिवसेनेचे उपप्रमुख प्रकाश शेटे यांनी स्वागत केले आहे.

शनिशिंगणापूर देवस्थानवर धमार्दाय आयुक्तांमार्फत विश्वस्त मंडळ नेमले जात होते. यात स्थानिक लोक असायचे. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील लोकांची विश्वस्तपदी नेमणूक होऊ शकेल. सन २०१६ साली सध्याच्या विश्वस्तांची नेमणूक करण्यात आली होती.

Loading...
संस्थानवर सरकार विश्वस्त मंडळ नेमणार असल्याच्या या निर्णयाचे शिवसेनेचे प्रकाश शेटे यांनी स्वागत केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की हा आतिशय चांगला व भाविक हिताचा निर्णय आहे. संस्थानच्या अनेक कामांच्या चौकशीसंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधी व न्याय खात्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील, आ. बाळासाहेब मुरकुटे, धर्मादाय आयुक्त यांना निवेदने दिली आहेत.

सध्याच्या विश्वस्त मंडळावर राजकीय प्रभाव होता. आता तो राहाणार नाही. या निर्णयामुळे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारचा निधी देवस्थानला मिळू शकेल. परिणामी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लागतील. भाविकांच्या पैशांचा चांगला वापर होईल. भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील व ज्या कमतरता असतील, त्या दूर होतील व कामात गतिमानता येईल, असा विश्वास शेटे यांनी व्यक्त केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.